विनायक पांडुरंग करमरकर, ऊर्फ नानासाहेब करमरकर, (ऑक्टोबर २, इ.स. १८९१; सासवणे, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - जून १३, इ.स. १९६७) हे मराठी शिल्पकार होते. मुंबईच्या सर जे.जे. कला विद्यालयात ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अलिबागजवळील सासवणे गावात त्यांच्या घरी शिल्पकारांचे करमरकर संग्रहालय उभारण्यात आले आहे. अलिबाग-रेवस रोड येथून १८ किमी अंतरावर स्थित एक संग्रहालय आहे जिथे कै. नानासाहेब करमरकर यांनी बनवलेले शिल्पकार त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात प्रदर्शित केले आहेत. येथे सुमारे १५० सुंदर कोरीव शिल्पे प्रदर्शित आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनायक पांडुरंग करमरकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.