रघुनाथ कृष्ण फडके (इ.स. १८८४ - १७ मे, इ.स. १९७२) हे मराठी शिल्पकार होते. यांना इ.स. १९६१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
रघुनाथ कृष्ण फडके यांनी मूर्तिकला, चित्रकला यांपैकी कशाचेही शिक्षण शाळा किंवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे या दोन कलांविषयी असलेले ज्ञान, माहिती व कौशल्ये हे सारे स्वकष्टातून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे प्रगल्भ झालेले होते. रघुनाथ फडके मात्र मूर्ती घडवण्याच्या कामात निपुण होते. मुंबईच्या चौपाटीवर असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा त्यांनीच घडवला. या पुतळ्याच्या बनावटीवरून फडके यांचे ओतकामातील कौशल्य व इतर काही तांत्रिक बाबी लक्षात येतात. महादेव धुरंधरांसारखे श्रेष्ठ चित्रकारदेखील त्यांना मानत होते.
रघुनाथ कृष्ण फडके
या विषयावर तज्ञ बना.