विदीत गुजराती हा बुद्धिबळपटू आहे. तो महाराष्ट्राचा तिसरा, तर भारताचा तिसावा ग्रँडमास्टर आहे. २७०० ची एलो गुणांकन ओलांडणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. तो बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये दुहेरी सुवर्णपदक विजेता आहे. तो आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेता देखील आहे. विदितने २०२३ फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकले आणि कॅंडिडेट्स स्पर्धेत पात्र ठरणरा तिसरा भारतीय बनला.
तो २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २०२३ ग्रँड स्विस स्पर्धेमध्ये खेळला. तो पहिल्या फेरीत पराभूत झाला, परंतु त्याच्या पुढील १० पैकी ७ खेळ जिंकून त्याने ८½/११ च्या गुणांसह स्पर्धा जिंकली. विदित ग्रँड स्विसच्या पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवून २०२४ च्या कॅंडिडेटस् स्पर्धेसाठी पात्र ठरला.
त्याने २०२४ च्या कॅंडिडेट स्पर्धेमध्ये सहावे स्थान पटकावले, विशेषतः त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये जागतिक क्र. ३ हिकारू नाकामुराचा पराभव केला.
विदीत गुजराथी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.