इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे प्रवाह सहसा सूक्ष्म दाबाचे असतात.
यातील उपकरणांत विविध विद्युत सर्किट्स (जोडण्या) असतात. या सर्किट्समध्ये चालू इलेक्ट्रीकल घटक जसे की निर्वात नळी, ट्रांझीस्टर, डायोड, आय.सी, ऑप्टोइलेक्ट्रोनिक्स, आणि संवेदक (सेन्सर) असतात.
विजाणूशास्त्र
या विषयावर तज्ञ बना.