लाइट एमिटिंग डायोड (इंग्लिश: light-emitting diode), लघुनाम एल्ईडी (रोमन लिपीतील लघुलेखन: LED ;) हा एक अर्धवाहक आहे. याची रचना पारंपरिक डायोडप्रमाणे असली तरी, एल्ईडीमध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरून जशी प्रकाशकिरणांची निर्मिती होते, तसे साध्या डायोडमध्ये होत नाही. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एल्ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने करून सूचना देण्यासाठी एल्ईडीचा वापर केला जातो. सध्या एल्ईडीचे प्रकाश देणारे विद्युत दिवे आणि दूरचित्रवाणीचे पडदे वापरात आले आहेत. लहान आकार व विजेचा कमी वापर ही एल्ईडीची जमेची बाजू आहे.
इ.स. १९६० च्या दशकात सुरुवातीला केवळ लाल रंगाचे एल्ईडी मिळत. पण नंतर दृश्य प्रकाशासोबतच अतिनील किरण आणि अवरक्त किरण बाहेर टाकणारे एल्ईडीही वापरात आले. अवरक्त एल्ईडींचा दूरदचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलरमध्ये होणारा वापर सुपरिचित आहे.
एलईडी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.