कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली. पुढे १९६० च्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे विश्वातील कृष्णविवरांचे अस्तित्त्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना २०२० साली नोबेल पारितोषिक दिले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णविवर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.