कॅस्टिला डी अगुआडा (पोर्तुगीज: वाटरपॉईंटचा किल्ला) हा वांद्रेचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा मुंबईचा वांद्रे येथील एक किल्ला आहे. पोर्तुगीज "कॅस्टेलो" (किल्लेवजा वाडा) साठी "कॅस्टिला" ही चुकीची स्पेलिंग आहे. योग्यरित्या, याला कॅस्टेलो दा अगुआडा म्हणले पाहिजे, असे असले तरी पोर्तुगीज त्यास प्रत्यक्षात फोर्ट डी बँडोरा (किंवा वांद्रे किल्ला) म्हणतात. हे वांद्रे येथील लँड्स एंड येथे आहे. दक्षिणेकडील माहीम बेट, माहिमची खाडी व अरबी समुद्रावर लक्ष्य ठेवण्यासाठी १६४० मध्ये टेहळणी बुरूज म्हणून पोर्तुगीजांनी बांधला. १६६१ मध्ये जेव्हा वांद्र्याच्या दक्षिणेकडील भाग जी मुंबईची सात बेटे इंग्रजांना आंदण दिल्यावर त्याचे सामरिक मूल्य वाढले. अगुआडा म्हणजे ती जागा जिथे ताजे पाणी झऱ्यांच्या स्वरूपात पोर्तुगीजांच्या जहाजांसाठी उपलब्ध असे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर उंचीपर्यंत अनेक पातळ्यांवर बांधण्ययात आला आहे. दिल चाहता है व बुढा मिल गया या हिंदी चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वांद्रेचा किल्ला
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!