वसंत गोविंद पोतदार (जन्म : जबलपूर, ६ सप्टेंबर, इ.स. १९३७; - नाशिक, ३० एप्रिल. इ,स, २००३) हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकूण १० हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले.
वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे.
वसंत पोतदार
यामागील विज्ञान आणि इतिहास.