वसंत दत्तात्रेय गुर्जर (२१ जानेवारी, इ.स. १९४४:मुंबई, महाराष्ट्र - ) हे एक मराठी कवी आहेत. त्यांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये झाले. एकोणीसशे साठ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन गुर्जर यांचे रुपारेल व सिद्धार्थ महाविद्यालयातून इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण झाले. ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागले. त्यांनी इ.स. १९५७पासून कविता लिहायला सुरुवात केली. एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकातल्या अनियतकालिकांच्या चळवळीतील ते ए कवी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसंत दत्तात्रेय गुर्जर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?