जे डोगर कडेकपारीमध्ये आणि जंगलात राहतात अशा आदिवासी समूहासाठी वनवासी हा शब्द भारतातील काही विशिष्ट संघटना वापरतात(आरएसएस). हेच एकटे भारतातील मूळ निवासी नाहीत हे ठसवण्यासाठी या शब्दाचा जन्म झाला. आदीवासींच्या विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती व परंपरा असतात. महाराष्ट्रात जवळपास ४५ आदिवासी जमाती आहेत .नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीचा एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल, पारधीे, टोकरे कोळी ,कोरकू, गोंड, वारली , कोळी महादेव, पावरा, कातकरी ,कोलाम, जमाती आहेत. आदिवासी त्याच्या हस्तकौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांचे दंडाअराने हे नृत्य प्रसिद्ध आहे. या समाजाची इतर समाजापासून फारकत झाली आहे. त्यामुळे इतरांना मिळणाऱ्या सोईसुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वनवासी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?