वडोदरा (बडोदे, बडोदा) (गुजराती: વડોદરા) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि बडोदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे/मुख्यालय आहे. या शहराचे गुजराती नाव वडोदरा, स्पेलिंग Baroda.. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील अहमदाबाद व सुरतखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.
१६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात मराठ्यांना यश आले. १७२१ साली येथे गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले. ब्रिटिश राजवटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.
सध्या वडोदरा गुजरातमधील उद्योगाचे मोठे केंद्र मानले जाते. खनिज तेल उद्योगामुळे वडोदऱ्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.
वडोदरा
या विषयातील रहस्ये उलगडा.