सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते.
पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यांच्या हस्ते झाले होते. परशुराम आठवले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात, १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात ३रे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला.
संमेलनात पास झालेले ठराव :
१. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.
२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.
संजय पवार यांच्या भाषणातून
"या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या."
सम्यक साहित्य संमेलन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.