वड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वड

वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान ;) हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसेल म्हणून बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापाऱ्याला बनिया म्हणतात म्हणून बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे.

भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, महाराष्ट्रातील पेमगिरी गावातील वटवृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कोलकात्याच्या शिवपूर बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला द ग्रेट बॅनियन ट्री प्रचंड असून त्यांच्या छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात. शिवपूर वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →