कळंब वृक्ष

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कळंब वृक्ष

कळंब किंवा कदंब ही झाडे भारतात पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांत आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

इतिहासातील प्रसिद्ध असणारे ब्राम्हण व नंतर क्षत्रिय झालेल्या कदंब कुळाची उत्पती ही याच झाडाखाली झाल्याचे इतिहासात नमूद आहे. कदंबाचे झाड हे क्षत्रिय कदम मराठा घराण्यातील लग्नामध्ये देवक म्हणून देखील पूजले जाते. तसेच हे झाड श्री कृष्णाचे आवडते झाड देखील आहे. तसेच महाभारतात प्रसिद्ध असणारा कर्ण-कुंती चा कर्ण जन्माचा वृतांत याच झाडाखाली झाला. त्यामुळे कदंब वृक्षाला इतिहासात व हिंदू साहित्यात मनाचे स्थान आहे.

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटर पर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षापर्यंत वाढ भर-भर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. वृक्ष दीर्घायुषी असून, शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. पानगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात.

पण वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →