वंदना घांगुर्डे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वंदना रवीन्द्र घांगुर्डे (माहेरच्या वंदना मधुकर पटवर्धन) या एक संगीत नाटकांत काम करणाऱ्या मराठी गायिका आहेत. त्यांचे वडील मधुकर दत्तात्रेय पटवर्धन हे इंजिनिअर असून रत्‍नागिरीतील एक उद्योजक होत. पाचवीच्या वर्गातर असताना असताना डॉ. वसंतराव देशपांडे यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक पाहून वंदनाला संगीतातच कारकीर्द करावेसे वाटू लागले. वडिलांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. पहाडी आवाजात ते भजने गात.

स्वातत्र्यवीर सावरकर रत्‍नागिरीत अकरा वर्षे स्थानबद्ध होते, तेव्हा ते पटवर्धनांच्या घरातच राहत असत. १९३१ साली बलवंत संगीत मंडळीच्या रत्‍नागिरीच्या मुक्कामात दीनानाथांच्या आग्रहामुळे सावरकरांनी पटवर्धनाच्या निवासस्थानी राहून ‘संन्यस्तखड्ग’ हे नाटक लिहिले. घांगुर्डे परिवाराने त्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले आहेत.

वंदना घांगुर्डे यांना लहानपणापासूनच गाण्याचे आणि नाटकांचे संस्कार मिळाले. त्यांची आजी गोड आवाजात भजने गायची. आई विद्या पटवर्धन (माहेरच्या विद्या जोग) या वंदनाला गाण्याच्या कार्यक्रमांना व नाटकांना घेऊन जात. मामा-दामोदर जोग, कार्तिक महिन्यातल्या उत्सवात गद्य वा संगीत नाटकांत प्रमुख भूमिका करत, आणि नाटकांचे दिग्दर्शनही करीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →