ल.म. कडू

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ल.म. कडू (जन्म : १० जुलै १९४७) हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७ च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली. या प्रकाशन संस्थेने चाळीस वर्षांत दोनशे पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशनातर्फे ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका २००४ सालापासून, आणि मुलांसाठी गमभन ही दिनदर्शिका २००५पासून प्रकाशित होत आली आहे.

मुलांना निसर्गाचा परिचय व्हावा यादृष्टीने कडू यांनी पानशेतजवळ सात एकर जागेवर ‘विद्याविहार पर्यावरण’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला काही वर्षांतच हजारो मुलांनी भेट दिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →