मानवी संस्कृतीच्या विकासातील एक कालखंड .पाषाण युगानंतर ताम्रयुग आणि कांस्य युग सुरू झाले.पुरातत्त्वशास्त्रानुसार लोह युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता, की जेव्हा लोखंड वा पोलाद ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. आर्य लोकांना लोहाचा उपयोग माहिती होता. मात्र लोहयुग केंव्हा सुरू झाले, हे निश्चितच सांगता येत नाही.कारण पुराण वस्तू संशोधनावरून असे ध्यानात येते की भिन्न भिन्न देशातील मानवांना लोहाचा उपयोग एकाच वेळी माहित झाला नव्हता.
भारतामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या उत्तर प्रदेश भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते. उपनिषदांमध्येदेखील धातुशास्त्राचा उल्लेख केला गेला आहे.
लोह युग
या विषयावर तज्ञ बना.