हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्त्वज्ञांनी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणाऱ्या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व काळातील 'रावी' अथवा 'हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पंजाब, पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले आहेत.
उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात, कालीबंगन, धोलावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद कुंथासी गिलुंड ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला.
हडप्पा संस्कृती
या विषयावर तज्ञ बना.