लोणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

दुधावर आलेल्य स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे, साधारणपणे आंबट दह्याचे, विरजण लावले की सायीचे दही होते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.

थालीपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप होते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.

दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.

असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →