लोणावळा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लोणावळा

लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.

लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.

लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की आणि काजू, बदाम यांपासुन बनवलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. वर्षाला ५० टन चिक्की निर्यात केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →