लोकदल किंवा लोक दल हा कृषी धोरणांवर आधारित भारतीय राजकीय पक्ष होता. याची स्थापना भारताचे माजी पंतप्रधान चरण सिंग यांनी केली होती. या पक्षाची स्थापना २६ सप्टेंबर, १९७९ रोजी जनता पार्टी (सेक्युलर), सोशालिस्ट पार्टी आणि ओरिसा जनता पार्टी यांच्या विलीनीकरणातून झाली. लोकदलाच्या अध्यक्षपदी चरणसिंग आणि कार्याध्यक्ष राज नारायण यांची निवड झाली.
ऑगस्ट १९८२ मध्ये लोकदलामध्ये मोठी फूट पडली. चरणसिंग यांचा एक तर दुसऱ्या गटात कर्पूरी ठाकूर, मधु लिमये, बिजू पटनायक, देवी लाल, जॉर्ज फर्नांडिस, कुंभ राम आर्य यांचा समावेश होता. लोकदल, जनता पक्ष आणि काँग्रेस (धर्मनिरपेक्ष) यांचे विलीनीकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या समन्वय समितीतून चरणसिंग यांनी या सदस्यांना घालवून दिल्याने हे नाराज झाले होते व ते पक्षाबाहेर पडले. जानेवारी १९८२ मध्ये, कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील लोकदल जनता पक्षात विलीन झाला.
२१ ऑक्टोबर १९८४ रोजी लोकदल, हेमवती नंदन बहुगुणा यांचा डेमोक्रॅटिक सोशालिस्ट पार्टी, रतुभाई अदानी यांची राष्ट्रीय काँग्रेस आणि देवी लाल यांसारख्या जनता पक्षाच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन दलित मजदूर किसान पक्षाची स्थापना केली. नंतर त्याचे नाव बदलून लोकदल झाले.
फेब्रुवारी १९८७ मध्ये लोकदल अजित सिंह यांचा लोकदल (अ) आणि हेमवती नंदन बहुगुणा यांचा लोकदल (ब) अशा दोन गटात विभागला गेला. अजित सिंग यांनी उत्तर प्रदेश विधानसभेतील लोकदलाचे नेते मुलायमसिंग यादव यांना नेतेपदावरून घालवून दिले आणि सत्यपाल सिंह यादव यांना लोकदलाचे नेते बनवले.
मे १९८८ मध्ये अजित सिंह यांनी लोकदलाचे जनता पक्षात विलीनीकरण केले आणि ते स्वतः जनता पक्षाचे अध्यक्ष बनले.
लोकदल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.