लेडी श्री राम कॉलेज फॉर विमेन (संक्षिप्त : एलएसआर) हे दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेले महिलांचे एक महाविद्यालय आहे.
स्वर्गीय लाला श्री राम यांनी आपल्या पत्नी फूलन देवी (लेडी श्री राम) यांच्या स्मृतीप्रत्यर्थ १९५६ मध्ये नवी दिल्लीत या महाविद्यालयाची स्थापना केली. मध्य दिल्लीतील दर्यागंज येथील एका शालेय इमारतीत अवघ्या २९९ विद्यार्थी, नऊ शिक्षक आणि चार सहायक कर्मचाऱ्यांसह या महाविद्यालयाची सुरुवात झाली. हे महाविद्यालय आता दक्षिण दिल्लीतील लजपत नगर येथील १५-एकर (६१,००० मी२) परिसरात विस्तारलेल्या संकुलात (कॅम्पस) स्थित आहे.
'एलएसआर' च्या पायाभूत सुविधांमध्ये इंटरनेट सुविधेसह एक ग्रंथालय आहे, ज्यामध्ये १२०० पुस्तके, ५० ऑनलाइन जर्नल्स आणि १२७९८ इन-हाऊस जर्नल्स व नियतकालिके उपलब्ध आहेत. या महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती आणि परोपकारी व्यक्तिमत्व भरत राम हे आहेत.
लेडी श्री राम कॉलेज फॉर विमेन
यामागील विज्ञान आणि इतिहास.