हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
लि ना अथवा ली ना (चिनी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà, फेब्रुवारी २६, इ.स. १९८२) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिस खेळाडू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली.
विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली.
२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजय मिळवून ली ने आपले दुसरे एकेरी ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवले.
ली ना
या विषयातील रहस्ये उलगडा.