लिन डॅन (१४ ऑक्टोबर, १९८३ - ) हा चीनचा माजी व्यावसायिक बॅडमिंटन खेळाडू आहे. तो दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, पाच वेळा विश्वविजेता, तसेच सहा वेळचा ऑल इंग्लंड चॅम्पियन आहे.
तो जगातला एक महान बॅडमिंटनपटू आहे. : वयाच्या 28 व्या वर्षी त्याने "सुपर ग्रँड स्लॅम" पूर्ण केला. बॅडमिंटन जगातील सर्व महत्त्वाची विजेतीपदे त्याने जिंकली. ऑलिंपिक, जागतिक चॅम्पियनशिप, विश्वकरंडक, थॉमस कप, सुदिरामन कप, सुपर सिरीज मास्टर्स फायनल्स, ऑल इंग्लंड ओपन, एशियन गेम्स, आणि एशियन चॅम्पियनशिप या सर्व स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अशी कामगिरी गाठणारा तो जगातला पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला. २००८ मध्ये ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकल्यानंतर सलग दुसऱ्यांदा २०१२ मध्ये पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक कायम राखणारा तो पुरुष एकेरीतला पहिलाच खेळाडू ठरला. २०१७ मध्ये मलेशियन ओपन जिंकणे बॅडमिंटन जगातील प्रत्येक मोठे जेतेपद मिळवण्याच्या लिनच्या यशाचे चिन्ह होते.
२००४ मध्ये ऑल इंग्लंड ओपन फायनल जिंकली. या स्पर्धेत त्याने प्रतिस्पर्धी पीटर गेड याचे आव्हान मोडीत काढल्यानंतर चाहत्यांनी, तसेच प्रसारमाध्यमांनी त्याला "सुपर डॅन" असे संबोधले. त्याच्या यशाची ही पावती होती.
लिन डॅन
या विषयातील रहस्ये उलगडा.