प्रकाश पडुकोण (कन्नड : ಪ್ರಕಾಶ ಪಡುಕೋಣೆ) (जन्मः१० जून १९५५) हे एक भारतीय माजी बॅडमिंटनपटू आहेत. हिंदी सिनेअभिनेत्री दीपिका पडुकोण ही प्रकाश पडुकोण यांची कन्या आहे. १९८० मध्ये ते जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होते; त्याच वर्षी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांना भारत सरकारने १९७२ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. ते ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत, हे भारतातील ऑलिम्पिक खेळांच्या प्रचारासाठी समर्पित संस्था आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाश पडुकोण
या विषयातील रहस्ये उलगडा.