लिंक्डइन हे एक वेब पोर्टल असुन वाणिज्य क्षेत्र, उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठींयासाठी ते प्रामुख्याने ओळखले जाते. या संकेतस्थळाचा शोध २८ डिसेंबर २००२ रोजी लागला आणि ५ मे २००३ रोजी सर्वांसाठी उपलब्ध झाले. फेसबुकवर ज्याप्रमाणे मित्रांचीची यादी असते तीच यादी लिंक्डइन येथे देखील असते त्याला कनेक्शन्स असे संबोधले जाते. इतर सोशल नेटववर्किंग साईट प्रमाणे यात देखील व्हिडीओ शेअरिंग, फोटो शेअरिंग, म्युझिक शेअरिंग, ब्लॉगिंग, मायक्रोब्लॉगिंग अश्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र फक्त व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी वापर केली जाणारी असणारी लिंक्डइन ही एकमात्र संकेतस्थळ आहे. व्यावसायिक जगतात लिंक्डइन ह्य़ा संकेतस्थळवर माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. एप्रिल २०१७ मधील माहितीप्रमाणे लिंक्डइनचे ५०० मिलिअन वापरकर्ते आहेत, ज्यातील १६० मिलिअन सदस्य हे रोज लिंक्डइनचा वापर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिंक्डइन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?