ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विषयातील रहस्ये उलगडा.

ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GUA, आप्रविको: MGGT) ग्वातेमाला देशातील ग्वातेमाला सिटी शहराचा मुख्य विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ६ किमी दक्षिणेस असलेला हा विमानतळ मध्य अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६मध्ये २७,५९,३४७ प्रवाशांनी येथून ये-जा केली.

ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ग्वाटेमालाचे प्राथमिक विमानतळ आहे. विमानतळाचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आले आहे. विमानतळ आता मोठ्या संख्येने उड्डाणे आणि मोठी विमाने स्वीकारण्यास सक्षम आहे. ते प्रवाशांना उच्च दर्जाची स्थापना प्रदान करते. जुन्या टर्मिनलचे त्याच्या मूळ डिझाइननुसार नूतनीकरण करण्यात आले आहे. ते अंशतः पाडण्यात आले आणि नवीन काचेच्या डिझाइनसह विस्तारित करण्यात आले आणि आता बावीस विमाने सामावून घेण्यास सक्षम आहे. हा मोठा प्रकल्प डिसेंबर २००८ पर्यंत पूर्ण झाला. विमानतळावर सध्या दोन टर्मिनल आहेत: मध्य आणि उत्तर.

येथून मध्य अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपच्या निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या वायुसेनेने येथे आपल्या तीन स्क्वॉड्रन तैनात केल्या होत्या. मध्य अमेरिकेतील बंदरांचे अक्ष राष्ट्रांच्या पाणबुड्यांपासून रक्षण करण्यासाठी ही विमाने येथून आणि इतर काही विमानतळांवरून उड्डाणे करीत.

४ जून, २०१८ रोजी जवळच्या व्होल्कान दे फुएगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा विमानतळ बंद केला गेला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →