लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. लसूण हा शब्द मराठीत पुंल्लिंगी आहे, पण लसणाच्या पाकळीला लसणी (स्त्रीलिंगी) म्हणतात.
प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
(हिंदी -. लसन, लहसुन; गुजराती - लसण; कानडी - बेळुवळ्ळी; संस्कृत - लशुनम्, उग्रगंधा, सोनह, रसोन; इंग्रजी - गार्लिक; लॅटिन - ॲलियम सटायव्हम-कुल-लिलिएसी Liliaceae आहे). ही ओषधीय वनस्पती कांदा व खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात. इ.स.पू. ५००० ते ३४०० या काळात इजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रोमेनिया व इजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्थिर होणे) झाले आहे.
लसूण
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.