लष्करी औद्योगिक संकुल ही देशाचे लष्कर आणि त्याला पुरवठा करणाऱ्या संरक्षण उद्योगांची अनौपचारिक युती आहे, ज्या कडे सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकणारे एकमेकांमधे गुंतलेले हितसंबंध या दृष्टीने पाहिले जाते. ह्या सर्व नातेसंबंधांना जोडणारा कळीचा मुद्दा म्हणजे सरकार आणि संरक्षण-विचार श्रेणी असणाऱ्या कंपन्या यांना होणारे फायदे - एका बाजूला युद्धासाठी आवश्यक सामग्री मिळवण्यात होणारा फायदा आणि दुसऱ्या बाजूला ती सामग्री पुरवून कमावलेला फायदा. अमेरिकेच्या लष्करा मागील प्रणालीच्या संदर्भात बहुतेक वेळा हा शब्द वापरला जातो, जेथे ही व्यवस्था प्रचलित आहे आणि आणि १७ जानेवारी १९६१ रोजी राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांच्या निरोपाच्या भाषणातील त्याच्या वापरा नंतर त्याला लोकप्रियता मिळाली. २०११ मध्ये अमेरिकेने त्याच्या पुढील १३ राष्ट्रे एकत्रित केल्यास, त्यापेक्षा अधिक खर्च लष्करावर केला (पूर्ण अंकात).
अमेरिके संदर्भात, याला दिलेली संज्ञा कधीकधी लष्करी-औद्योगिक-काँग्रेसी संकुल इथपर्यंत वाढविली जातो, ज्यामध्ये यु.एस. काँग्रेसला यामध्ये जोडून जे तीन पक्षीय संबंध तयार होतात त्याला 'लोह त्रिकोण' म्हणतात. यातील संबंधांमध्ये राजकीय योगदान, लष्करी खर्चासाठी राजकीय मान्यता, नोकरशाहीस समर्थन देण्यासाठी दबाव आणि उद्योगाची देखरेख याचा समावेश होतो; किंवा अधिक विस्ताराने यामध्ये कंत्राटांचे जाळे आणि व्यक्ती तसेच संरक्षण कंत्राटदारांचे उद्योगसमूह आणि संस्था, खाजगी लष्करी कंत्राटदार, पेंटागॉन, काँग्रेस आणि कार्यकारी विभाग यांच्यातील पैसा व साधनसंपत्तीचा प्रवाह याचा समावेश होतो.
यासारखे एक तत्त्व मूलतः डॅनियल गेरिन यांनी आपल्या १९३६ च्या 'फॅसिझम ॲण्ड बिग बिझनेस' मध्ये तत्कालिक अवजड उद्योगांना फॅसिस्ट सरकारने दिलेल्या पाठिंब्या संदर्भात व्यक्त केले आहे. याची व्याख्या "उच्चस्तरीय शस्त्रास्त्रांचा विकास आणि ती बाळगण्यात, वसाहती बाजारपेठांचे संरक्षण करण्यात तसेच अंतर्गत घडामोडींच्या लष्करी-सामरिक संकल्पना निर्मितीत; मानसिक, नैतिक आणि भौतिक हितसंबंध गुंतलेल्या गटांची, अनौपचारिक आणि कायम बदलत जाणारी आघाडी" अशी करता येईल. फ्रांज लिओपोल्ड न्यूमन यांच्या 'बेहेमोथ: द स्ट्रक्चर अँड प्रॅक्टिस ऑफ नॅशनल सोशलिझम' या पुस्तकात, १९४२ मध्ये नाझीवाद लोकशाही राज्यात कसा सत्तास्थानी आला याचा अभ्यास प्रदर्शित झाला आहे.
अशा प्रकारचे संकुल, अमेरिकेला पहिल्या महायुद्धात 'शत्रूशी व्यापाराचा कायदा, १९१७' कडे घेऊन गेले.
लष्करी औद्योगिक संकुल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.