लय भारी (चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लय भारी (चित्रपट)

लई भारी हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात राधिका आपटे आणि आदिती पोहनकर मुख्य अभिनेत्री होते. शरद केळकर, उदय टिकेकर आणि तन्वी आझमी या चित्रपटाचे सह-कलाकार होते. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा आणि सलमान खान यांच्या या चित्रपटात छोट्या भूमिका आहेत. हा चित्रपट २०१४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. २५ जानेवारी २०१५ रोजी लई भारीने मागील सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट महाराष्ट्रात १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत चित्रपटगृहांमध्ये होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →