लखनौ सुपर जायंट्स हा लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. हा संघ भारतीय प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार आहे. संघाची मालकी RPSG समुहाकडे आहे ज्यांच्याकडे यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट फ्रँचायझी होती. संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे तर प्रशिक्षकपदाचा भार अँडी फ्लॉवर यांच्याकडे आहे.
आयपीएल २०२२ च्या १५ व्या आवृत्तीसाठी लखनौ फ्रँचायझी नव्याने स्थापन करण्यात आली. संजीव गोयंका यांच्या मालकीच्या RPSG ग्रुपने तब्बल ७,०९० कोटी रुपयांना फ्रँचायझी विकत घेतली. यापूर्वी, आयपीएल २०२१ पर्यंत आठ संघ एकमेकांसोबत खेळत होते. लखनौ संघाने २४ जानेवारी २०२२ रोजी अधिकृत ट्विटर हँडलवर आयपीएल २०२२ साठी त्यांचे नाव "लखनौ सुपर जायंट्स" म्हणून घोषित केले.
लखनौ सुपर जायंट्स २०२२ संघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.