ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.
जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.
ऱ्हाइन नदी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?