रोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज आहे. जगभरात २० लाखावर रोहिंग्या लोक आहेत. म्यानमारमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे. २०१२ च्या आकडेवारीनुसार, म्यानमारमध्ये ८,००,००० रोहिंग्या लोक होते, तर २०१७ पर्यंत ही संख्या १३,००,००० वर पोहचली. भारतमध्ये ह्या समाजाची ३६,००० लोकसंख्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मतानुसार रोहिंग्या समाज हा जगातील सर्वात पीडित समाज आहे. अनेक रोहिंग्या हे शेजारी बांग्लादेश आणि थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागातील अनिवासी कँपमध्ये राहत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिंग्या
या विषयातील रहस्ये उलगडा.