जय भीम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जय भीम

जय भीम हे नवयानी बौद्ध आणि आंबेडकरवादी जनतेद्वारे वापरले जाणारे एक अभिवादन शब्द वा वाक्य आहे. ‘जय भीम’चा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा होय. ‘जय’ म्हणजे ‘विजय’ आणि ‘भीम’ हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे. जय भीम हे अभिवादन हे बौद्ध, दलित, आदिवासी, शोषित, पिडित किंवा मागांस समाजातील लोकांसाठी अस्मितेचे व क्रांतिचे प्रतिक बनलेले आहे. हे अभिवादन आपल्या मूळ अर्थाने धार्मिक स्वरूपाचे नसून याला धार्मिक रूपात कधीही मानले गेले नाही. पण जवळजवळ सर्वच भारतीय बौद्ध हे आंबेडकरवादी असल्यामुळे याला भारतीय बौद्ध अनुयायांचा अभिवादन वा प्रतिक शब्द आता मानला जातो. जय भीम हा शब्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या विचारांप्रती सन्मानाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. हे शब्द स्वाभिमान आणि सन्मानाने अभिवाद वा शुभेच्छा आहेत, जे याचा उच्चार करतात त्यांना प्रोत्साहन मिळते. कोट्यवधी भारतीय व्यक्ती, राष्ट्रीय नेते 'जय भीम'चा नारा देतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →