भीमगीत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भीमगीत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हणले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत, तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहीर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगीते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांमध्ये वाजवली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →