रेखा देशपांडे रेखा देशपांडे या ज्येष्ठ पत्रकार, चित्रपटसमीक्षक, अनुवादक व पटकथालेखिका आहेत. माधुरी, धर्मयुग, जनसत्ता, स्क्रीन, लोकसत्ता आदी नियतकालिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षक म्हणून दीर्घकाळ लेखन केले. रुपेरी, चांदण्याचे कण, स्मिता पाटील, नाटिका, मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास, तारामतीचा प्रवास ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. विविध विषयांवरील ३५ हून अधिक ग्रंथांचे त्यांनी हिंदी-मराठी अनुवाद केले आहेत. गेली चार दशके त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या समीक्षक व ज्युरी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दूरदर्शनसाठी सावल्या, कालचक्र, आनंदी गोपाल या मालिकांचे तसेच कथा तिच्या लग्नाची या चित्रपटाचे त्यांनी पटकथा-संवादलेखन केले आहे. तसेच या मराठीतल्या अनुवादक व चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ॲगाथा ख्रिस्ती यांच्या इंग्रजी कादंबऱ्या पाच संचांत समाविष्ट होऊन प्रकाशित झाल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेखा देशपांडे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.