रूपा कुडवा या ओमिडयार नेटवर्क इंडिया ॲडव्हायझर्स आणि ओमिडयार नेटवर्क पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओमिडयार नेटवर्क ही अमेरिकेतील परोपकारार्थी गुंतवणुक करणारी संस्था आहे.
२००७ मध्ये क्रिसिलच्या प्रमुख कार्यकारी अधिकारिपदी विराजमान झाल्यावर रूपा कडवा यांनी या फर्मचा महसूल तिपटीहून जास्त वाढवला, फर्मचा बाजारातला भांडवली हिस्सा (मार्केट कॅपिटलायझेशन) चौपट केला, आणि भारतातली एक रेटिंग एजन्सी ते डायव्हर्सिईफाड ग्लोबल ॲनालिटिकल कंपनी अशा क्रिसिलच्या वाटचालीचं नेतृत्व केलं. व्यावसायिक क्षेत्रातल्या सर्वात सामर्थ्यशाली स्त्रियांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे (फॉर्म्युन इंडिया, २०११ ते २०१४)आणि आऊटस्टॅंडिंग बिझनेस लीडर ऑफ द इयर' (CNBC-TV18, इंडिया बिझनेस लीडर ॲवॉर्ड्स (IBLA २०१२)सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.[१]
रूपा कुडवा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?