रितु मेनन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रितु मेनन या भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशिका आहेत. त्यांनी १९८४मध्ये उर्वशी बुटालिया यांसह काली फॉर विमेन ही स्त्रीवादी प्रकाशन संस्था काढली. २००३ मध्ये ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी विमेन अनलिमिटेड ही प्रकाशन संस्था काढली.

त्यांनी अनेक वृत्तपत्रीय लेख आणि मतलेख लिहिले असून त्यांच्या लेखनात स्त्रियांवरील हिंसा, धर्मातील स्त्रियांचे स्थान आणि समाजातील लिंगभेद यांसारख्या विषयांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार केला आहे. मेनन यांनी कमला भसीन यांच्यासह Borders & Boundaries: Women in India's Partition हे पुस्तक १९९८ मध्ये लिहिले. झोया हसन यांच्यासह त्यांनी Unequal Citizens: A Study of Muslim Women in India हे पुस्तक २००६ मध्ये लिहिले. कल्पना कन्नबिरन यांच्यासह त्यांनी From Mathura to Manorama: Resisting Violence Against Women in India हे स्त्रियांवरील हिंसेविरुद्धच्या भारतीय स्त्रीवादी चळवळीचा आढावा घेणारे पुस्तक २००७ मध्ये लिहिले. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी Address Book: A Publishing Memoir in the Time of COVID हे प्रकाशनक्षेत्रातील अनुभवांवर आधारित आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →