राहाता बसस्थानक महाराष्ट्राच्या राहाता तालुक्यातील बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे सेवा पुरवली जाते.
हे बस स्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) नगर विभागांतर्गत येते. नगर-मनमाड या राज्य महामार्गावर असलेले हे स्थानक शिर्डी या तीर्थक्षेत्रापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. येथून शिर्डी, अहमदनगर, कोपरगाव, नाशिक, पुणे आणि मनमाड यांसारख्या प्रमुख शहरांसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकात फलाट, चौकशी खिडकी आणि विश्रामगृहाची व्यवस्था आहे. शिर्डीला जाणारे यात्रेकरु येथून इतर ठिकाणाला ये-जा करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी हे मुख्य साधन आहे.
राहाता बसस्थानक
या विषयातील रहस्ये उलगडा.