राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ किंवा राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड (लघुरूप:NDDB) ही एक भारतीय संसदेने स्थापन्न केलेली वैधानिक संस्था आहे. हे मंडळ भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. याचे मुख्य कार्यालय आणंद, गुजरात येथे असून देशभरात प्रादेशिक कार्यालये आहेत. NDDBच्या उपकंपन्यांमध्ये 'इंडियन डेरी मशिनरी कंपनी लिमिटेड', 'मदर डेरी' आणि 'इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड, हैदराबाद' यांचा समावेश आहे. उत्पादक संस्थांना वित्तपुरवठा आणि सहकार्य देण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचे कार्यक्रम आणि उपक्रम शेतकरी सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी आणि अशा संस्थांच्या वाढीस अनुकूल असलेल्या राष्ट्रीय धोरणांना अमलात आणण्यास बांधील असतात. सहकारी तत्त्वे आणि सहकारी धोरणे मंडळाच्या प्रयत्नांसाठी मूलभूत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.