सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून दरवर्षी दिला जाणारा एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. हा चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या आणि सुवर्ण कमळाने सन्मानित केलेल्या अनेक पुरस्कारांपैकी एक आहे.
१९५४ मध्ये पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला आणि दरवर्षी देशभरात सर्व भारतीय भाषांमध्ये तयार झालेल्या बालचित्रपटांना दिला जातो. २०२२ पर्यंत ह्या श्रेणीत हिंदी (२८ पुरस्कार), बंगाली आणि कन्नड (७ पुरस्कार), मल्याळम (६ पुरस्कार), इंग्रजी (५ पुरस्कार), मराठी (३ पुरस्कार), तमिळ, तेलुगू, उडिया आणि आसामी (प्रत्येकी १ पुरस्कार) मिळाले आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.