दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून दरवर्षी दिला जाणारा एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. हा चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या आणि सुवर्ण कमळाने सन्मानित केलेल्या अनेक पुरस्कारांपैकी एक आहे.
हा पुरस्कार १९८० मध्ये २८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सुरू करण्यात आला आणि दरवर्षी देशभरात सर्व भारतीय भाषांमध्ये तयार झालेल्या चित्रपटांना दिला जातो. २०२२ पर्यंत हा हिंदी (११ पुरस्कार), बंगाली आणि मल्याळम (प्रत्येकी ९ पुरस्कार), तमिळ (५ पुरस्कार), मराठी (३ पुरस्कार), आसामी, इंग्रजी आणि तेलुगू (प्रत्येकी २ पुरस्कार), हरियाणवी, जसरी, कार्बी आणि लडाखी (प्रत्येकी १ पुरस्कार) देण्यात आले आहे.
या पुरस्कारात 'गोल्डन लोटस अवॉर्ड' (स्वर्ण कमळ) आणि रोख बक्षीस समाविष्ट आहे. ६९ व्या आवृत्तीपर्यंत हा पुरस्कार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देण्यात येत होता. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांपासून हे नाव लहान करून "दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट" असे ठेवण्यात आले, आणि फक्त दिग्दर्शकालाच हा पुरस्कार दिला जातो व बक्षीस रक्कम ३,००,००० पर्यंत वाढवण्यात आली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पदार्पणाचा चित्रपट
यामागील विज्ञान आणि इतिहास.