राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

राज्य पुरस्काराने १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा उर्वशी पुरस्कार" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. १९७५ मध्ये, त्यास "सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रजत कमल पुरस्कार" असे नाव देण्यात आले. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, कन्नड, इंग्रजी, तेलगू, आसामी आणि उर्दू अशा दहा प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.

पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता बॉलिवूडमधील नर्गिस दत्त होता, ज्यांना १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले १९६७ च्या रात और दिन चित्रपटामधील अभिनयाबद्दल. २०२२ पर्यंत रजत कमल पुरस्कार सर्वाधिक जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी आहे ज्यांना पाच वेळा हा सन्मान मिळाला आहे. नंतरचा क्रमांक येतो शारदा आणि कंगना राणावत यांचा ज्यांना तीन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. २०२२ पर्यंत स्मिता पाटील, अर्चना, शोभना आणि तब्बू यांनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

शारदा, अर्चना आणि शोबाना या तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये कामगिरीसाठी पुरस्कार मिळालेल्या तीन अभिनेत्री आहेत. शारदा यांना मल्याळम व तेलगू चित्रपटांमधील कार्यासाठी पुरस्कारासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्चनाला तमिळ व तेलगू आणी शोभनाला मल्याळम व इंग्रजी चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले होते. २०२२ पर्यंत, मोनिषा उन्नी सर्वात कमी वयाच्या मानकरी ठरल्या आहेत जेव्हा त्यांना १९८६ मध्ये १६व्या वर्षांत मल्याळम चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला. इंद्राणी हलदार आणि रितुपर्णा सेनगुप्ता या दोन अभिनेत्री आहेत ज्यांना एकाच चित्रपट - दहन साठी सन्मानित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →