राष्ट्रकुल खेळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. इ.स. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी भरवले जातात. सुरुवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ, नंतर इ.स. १९५४ पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व इ.स. १९७० पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ ह्या नावंनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव ह्या स्पर्धेला दिले गेले.

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था ह्या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात.

राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ पाठवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →