राष्ट्र सेविका समिती ही भारतातील हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी महिला संघटना असून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी मानली जाते. लक्ष्मीबाई केळकर यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २५, १९३६ रोजी राष्ट्रसेविका समिती स्थापण्यात आली. राष्ट्र सेविका समिती ह्या संघटना राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत. अखंड ८० वर्षे कार्यरत असणारी एकमेव सर्वात मोठी अखिल भारतीय हिंदू स्त्री संघटना होय. महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर सक्षम बनावे, तसेच मानसिक, शारीरिक व बौद्धिकरीत्या सक्षम बनावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. देशभरात तीन हजारहून अधिक शाखा व अन्य सेवा कार्यात समितीचे योगदान आहे. राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्यासाठी राष्ट्रसेविका समितीचे उद्देश आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रसेविका समितीचे कार्य सुरू असून सुमारे बारा देशात हिंदू सेविका समितीच्या नावाने कार्य सुरू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्र सेविका समिती
या विषयातील रहस्ये उलगडा.