राय बागन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सावित्रीबाई देशमुख (मृत्यू :१६६० च्या दशकात), उर्फ रायबागन (संस्कृत - राजव्याघ्रि; इंग्लिश :रॉयल टायग्रेस), ही सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीतील एक मराठी महिला मुघल सेनापती होती. ती दख्खनमधील माहूर येथील मुघल सरदार राजे उद्धवजी रामजी उर्फ उदाजीराम उर्फ राजे उदारम यांची विधवा होती. सामुगडच्या लढाईत तिच्या मुलाच्या मृत्युनंतर तिने तिच्या पतीच्या प्रदेशाचा कारभार हाती घेतला. तिचा मुलगा जगजीवन औरंगजेबाकरता लढत होता, तेव्हा हरचंद रायने त्याच्या प्रदेशावर हल्ला केला. कारभार हाती आल्यावर तिने हरचंद रायाचा पराभव करून ठार मारले. तिच्या धाडस आणि शौर्यासाठी, औरंगजेबाने तिला 'राय बागन' पदवी बहाल केली. ती मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध शाहिस्तेखानाच्या मोहिमेत सहभागी झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →