राज्य निवडणूक आयोग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) ईत्यादींचे निवडणुक अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.



त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे.



राज्यघटनेच्या, नरसिंहराव सरकारच्या सन 1992 मध्ये पारित झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीनुसार, हा बदल करण्यात आला. २६ एप्रिल १९९४ पासून हा बदल लागू झाला.

राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत. त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचेही अधिकार आहेत.



तसेच, ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर केला नाही त्यांना अपात्र ठरविणे इत्यादी अधिकारही या आयोगास आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →