भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता

या विषयातील रहस्ये उलगडा.

भारतात भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता अथवा 'निवडणुकीची आदर्श आचारसंहिता' किंवा सामान्यपणे ज्यास निवडणुकीची आचारसंहिता असेही संबोधल्या जाते, ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून म्हणजे एखाद्या क्षेत्राची निवडणूक घोषित झाल्यापासून ते ती निवडणूक संपून निकाल बाहेर येतपर्यंत लागू असते. या आचारसंहितेत विविध राजकीय पक्षांनी व निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशा प्रकारची वर्तणूक ठेवायची याचे सविस्तर विवरण आहे. या आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना बंधनकारक असते. निवडणुकीत सामिल मान्यताप्राप्त अथवा अ-मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या अथवा अपक्ष/स्वतंत्र उमेदवारांनी भाषण, मतदानाचा दिवस,मतदान केंद्र, निवडणुकीचा जाहिरनामा, मिरवणुका, प्रचार, घोषणा व सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात याचे विवेचन केले आहे. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त व योग्य वातावरणात पार पडाव्यात, त्यात काही जातीय दंगेधोपे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.



ही आचारसंहिता नीटपणे पाळल्या जाते कि नाही यावर संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांची देखरेख असते. या बाबतचा अहवाल हा संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यास राज्य निवडणूक आयोग अथवा भारतीय निवडणूक आयोग याकडे पाठवावी लागते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →