राजेंद्र केरकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

राजेंद्र केरकर

राजेंद्र पांडुरंग केरकर (जन्म १९६५) हे एक भारतीय पर्यावरणवादी, लेखक, पत्रकार आणि संशोधक असून गोवा व शेजारच्या प्रदेशातील निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ते काम करतात. पूर्वी ते शाळेमध्ये शिक्षक होते.परंतु आपला पूर्ण वेळ निसर्गासाठी देण्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. म्हादई बचाव अभियान या संस्थेचे ते सचिव आहेत. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १९९९ साली म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि नेत्रावली वन्यजीव अभयारण्य ही दोन अभयारण्ये घोषित करण्यासाठी चळवळ सुरू केली. गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी अनेक वर्तमान पात्रातून लिहिले आणि गोव्यात व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. आपल्या गावात "विवेकानंद विद्या मंदिर" ही शाळा त्यांनी सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →