राजीव तांबे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३ सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत. मराठीसृष्टी या मराठी संकेतस्थळावर राजीव तांबे यांचे लेखन असते.

पुणे शहरात नोव्हेंबर २०१३ मध्ये २५ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन झाले होते. राजीव तांबे त्याचे नियोजित अध्यक्ष होते.



राजीव तांबे



हे युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करतात.

ते “अभ्यासक्रम समिती”चे सदस्य आहेत.

ते “राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समिती”चे सदस्य आहेत.

त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपर वाचन केले आहे.

“गंमतशाळा” या त्यांच्या अभिनव संकल्पनेची निर्मिती आहे, तशा शाळाही ते चालवतात.

त्यांची पुस्तके आणि त्यांची भाषांतरे परदेशामधून प्रकाशितझाली आहेत.

त्यांना अनेक राज्य व केंद्र पुरस्कारांनी सन्मानितकेले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →